Skip to main content of main site

बळीराजा... मरायचे नाही, आत्ता लढायचे...

३० गुंठे जमिनीचा मालक, मालक कसला, शेतमजूर... कस-बस आपले आणि परिवाराचे उदरनिर्वाह भागेल तेवढे काबाड कष्ट करायचा, लेक मोठ्ठी झाली, काट-कसरीने लेकाला आठव्या वर्गा पर्यंत शिकवलं, लेकीचे लग्न ठरले, थोड फार पिक हि झाल तरी सगळे पैसे खर्चून लेकीचे लग्न उरकून द्यावे... या आशेने जगत होता... 

सुलतानी अन्याय अत्याचाराला... आस्मानी संकटाची जोड मिळाली... अवकाळी पाऊस अन गारपीट झाली... उरली सुरली आस हि तुटली... सगळे पिक नष्ट झाले... पंचवीस दिवसावर लेकीचे लग्न आले... आत्ता काहीच होऊ शकत नाही.. या भावनेने ग्रस्त... नैराश्यातून आत्म्हत्ये शिवाय पर्याय गवसला नाही... व 'किशन गणपती कौशल्या' नावाच्या ४२ वर्ष वय असलेल्या तरुण शेतकर्याने ७ एप्रिल २०१५ रोजी  'गळ फास' लावून आत्म हत्या केली... sad

आम आदमी पार्टीच्या "ग्रामीण संपर्क अभियाना"च्या माध्यमातून कंधार तालुक्यातील हि गाथा कळाल्यावर 'आप'च्या कार्यकर्त्यांनी श्री डांगे, फुलारी, विभूते व आदींनी सार्वजनिक रित्या पैसे व अन्नधान्य गोळा केले... व २८ एप्रिल रोजी सार्वजनिक पद्धतीने हि सहाय्यता दिली... 

प्रश्न 'सहाय्यता केल्याचे' दाखवायचे नाही... प्रश्न आहे ते जाणीवेचा... संवेदनेचा... आपल्या जिवंतपणाच... माझ्या किंवा माझ्या सहकार्यांच्या अत्यल्प मदतीने 'ती' गरज भागणारी असती तर आमच्या सहाय्तेची बाब या हातावरून त्या हाताला सुद्धा कळू दिली नसती... परंतु माझ्या ताटातली दोन्ही भाकरी देऊन सुद्धा... त्या 'हत्ती'ची भूक भागणार नसेल.. तर मला माझ्या दोन भाकरी पुढे करून आव्हान करावेच लागेल... बाबारे... हा हत्ती खूप भुकेला आहे, काही खाल्ला नाही तर मरेल तो... या हत्तीला मी माझ्या ताटातले दोनच्या दोन भाकर्या देतोय... तुम्ही अर्धा-पाव तुकडा द्या.. या हत्तीचा जीव वाचवा... म्हणून आमची अत्यल्प मदत हि जाहीर रित्या करण्यात आली आहे... परंतु कदाचित खरा प्रश्न हे पण नव्हे... कारण प्रश्न या एखाद दोन आत्म्हत्यांचा नव्हे... तर एकूण ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुरांच्या आत्म्हत्येन्चां आहे.... दर रोज दिवसा एक तरी आत्महत्या नांदेड जिल्ह्यात होत आहे... त्यातील अर्ध्यांना 'शासन मान्यता' मिळते.. व अर्ध्यांकडे स्वतःच्या नावाने ७-१२ नसेल, फाशी / विष पिउन आत्महत्या नसेल तर त्यास 'शेतकरी आत्महत्या' गृहीत धरत नाही... 

या सगळ्या परिस्तिथीला जबाबदार कोण? आत्महत्या सहित ग्रामीण समस्यांचे 'दोषी' कोण? शासनाच्या चुकीच्या धोरणांकडे तर सर्वच राजकीय पुढारी बोट दाखवत आहेत... अन ते खरे हि आहे.. पण फक्त काही राजकीय व ग्रामीण जनतेने शासनाकडे बोट दाखवून होणार काय?? तर शहरी व कर्मचारी वर्ग सकाळी चहाचे घोट घेत घेत वृत्तपत्र वाचत असताना आत्महत्येची 'आकडेवारी' वाचून ग्रामीण शेतकर्यांबद्दल हळहळ व्यक्त करून दिवस भर त्याला विसरून आपापल्या दैनंदिन कार्यात गुंततो... किंवा जास्तीत जास्त.. आपण काय करणार? ते आपले काम नाही.. अमक्याने तमक्याने करायला  हवे... असे विचार करून... आपली जबाबदारी झटकतो... अश्या परिस्तिथित त्या 'आत्महत्येला' आत्महत्या म्हणायची कि 'हत्या' व या हत्येला शासनतर जबाबदार आहेच... पण काही प्रमाणात का असेना... आपण पण आहोत... शासनाच्या धोरणांचा उघडपणे विरोध व निषेध करण्याचे 'औदार्य' आपण पण दाखवले नाही.. गले-गट्ठ पगारी वाढवून घेण्याकरिता मोर्चे काढणारे कधीच ग्रामीण विकासासाठी पुढाकार घेतले नाही... उपलब्ध मार्गाने आपण आपला 'आवाज' कधी उठवलाच नाही... फक्त शेतकऱ्यांनी लढावे... हि अपेक्षा बाळगून जमणार नाही... शेतकरी अक्ख्या जगाचा पोशिंदा आहे... आपण हि त्याच्या श्रामानेच जिवंत आहोत... पोशिन्दाच जगला नाही... तर कागदाच्या नोटा खाता येणार नाहीत... भुकेला औषध नाही... अन हवा (ती हि शुद्ध राहिली नाही) श्वास देईल पण पोट भरणार नाही... जो पर्यंत आपण अन्नधान्य खातो... तो पर्यंत आपण शेती व ग्रामीण भागाशी 'सरळ' जुडलेले आहोत... आपल्याला आपली जबादारी ओळखावी लागेल... व 'स्व'च्या चौखटीला (उंबरठ्याला) ओलांडावे लागेल... शहरी जनता ग्रामीण शेतकरी व शेतमजुराच्या पाठीशी उभी टाकल्या शिवाय.. या समस्या सुटणार नाही... तर चला... निघा बाहेर... या लढा व सांगा... बळीराजा... मरायचे नाही... आत्ता लढायचे !!!

 

-फारुक अहमद

 

Make a Donation